मध्य रेल्वे चालविणार २६० पूजा/उत्सव विशेष ट्रेन

मुंबई (Mumbai).  प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई-पुरी/गोरखपूर / हुब्बळी / हटिया / विशाखापट्टणम / रक्सौल / भुवनेश्वर आणि पुणे-संत्रागाची दरम्यान २६० पूजा/उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत. 

मुंबई (Mumbai).  प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई-पुरी/गोरखपूर / हुब्बळी / हटिया / विशाखापट्टणम / रक्सौल / भुवनेश्वर आणि पुणे-संत्रागाची दरम्यान २६० पूजा/उत्सव विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत.

१. लोकमान्य टिळक टर्मिनस- पुरी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (१२ ट्रिप)

ट्रेन क्रमांक 02865 विशेष सुपरफास्ट साप्ताहिक दि. २२.१०.२०२० ते २६.११.२०२० पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पुरीला पोहोचेल.
ट्रेन क्र .02866 विशेष सुपरफास्ट साप्ताहिक दि. २०.१०.२०२० ते २४.११.२०२० पर्यंत दर मंगळवारी पुरी येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे व वेळः नियमित रेल्वे क्रमांक 22865/22866 लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस नुसार

संरचना : १ प्रथम वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.

२. लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष दैनिक (८४ फे-या)

ट्रेन क्रमांक 05017 विशेष दि. २२.१०.२०२० ते ०२.१२.२०२० पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज सुटेल आणि दुसर्‍या दिवशी गोरखपूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 05018 विशेष दि. २०.१०.२०२० ते ३०.११.२०२० पर्यंत गोरखपूरहून दररोज सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे व वेळः कसारा, इगतपुरी, देवळाली, नांदगाव, नेपानगर, जैतवार, बरूड, सुरगाव बंजारी, जसरा व दाभाौरा हि स्थानके वगळता प्रयागराज मार्गे असलेल्या नियमित गाडी क्रमांक 15017 / 15018 एलटीटी – गोरखपूर एक्सप्रेस प्रमाणे.

संरचनाः २ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि ८ द्वितीय आसन श्रेणी.

३. मुंबई-गोरखपूर विशेष (१२ फे-या)

02597 विशेष दि. २०.१०.२०२० ते २४.११.२०२० पर्यंत (६ फे-या) दर मंगळवारी ०८.३० वाजता गोरखपूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दुसर्‍या दिवशी १२.२० वाजता पोहोचेल.
02598 विशेष दि. २१.१०.२०२० ते २५.११.२०२० पर्यंत (६ फे-या) दर बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १८.३५ वाजता गोरखपूरला पोहोचेल.

थांबे : कल्याण, भुसावळ, इटारसी, भोपाळ, झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.

संरचनाः १७ द्वितीय आसन श्रेणी.

४. लोकमान्य टिळक टर्मिनस- हुब्बळी विशेष (८० फे-या)

ट्रेन नंबर 07318 विशेष दि. २३.१०.२०२० ते १.१२.२०२० पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज सुटेल आणि दुसर्‍या दिवशी हुबळीला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 07317 विशेष दि. २२.१०.२०२० ते ३०.११.२०२० पर्यंत दररोज हुबळी येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे व वेळ: नियमित गाडी क्रमांक 17317/17318 एक्सप्रेस नुसार

संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान आणि ८ द्वितीय आसन श्रेणी.

५. लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया विशेष साप्ताहिक (१२ फे-या)

गाडी क्र. 02811 विशेष दि. २५.१०.२०२० ते २९.११.२०२० पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी हटिया येथे पोहोचेल.
गाडी क्र. 02812 विशेष दि. २३.१०.२०२० ते २७.११.२०२० पर्यंत हटिया येथून दर शुक्रवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे आणि वेळः 02811 साठी इगतपुरी वगळता नियमित गाडी क्रमांक 12811/12812 एक्सप्रेस प्रमाणे.

संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १५ शयनयान आणि २ द्वितीय आसन श्रेणी.

६. लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम विशेष साप्ताहिक (१२ फे-या)

ट्रेन क्रमांक 02858 विशेष दि. २७.१०.२०२० ते १.१२.२०२० पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी सुटेल आणि विशाखापट्टणमला दुसर्‍या दिवशी पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 02857 विशेष दि. २५.१०.२०२० ते २९.११.२०२० पर्यंत विशाखापट्टणम येथून दर रविवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

थांबे व वेळः नियमित गाडी क्रमांक 22847/22848 लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापट्टणम एक्सप्रेस प्रमाणे.
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ८ द्वितीय आसन श्रेणी.

७. मुंबई-रक्सौल विशेष साप्ताहिक (१२ फे-या)

02546 विशेष दि. २६.१०.२०२० ते ३०.११.२०२० पर्यंत (६ फे-या) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी सुटेल व दुसर्‍या दिवशी रक्सौलला पोहोचेल.
02545 विशेष दि. २२.१०.२०२० ते २६.११.२०२० पर्यंत (६ फे-या) रक्‍सौल येथून दर गुरुवारी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे व वेळः नियमित गाडी क्रमांक 12545/ 12546 एक्सप्रेस प्रमाणे.

संरचना : २३ द्वितीय आसन श्रेणी.

८. लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर विशेष द्वि- साप्ताहिक सुपरफास्ट (२४ फे-या)
ट्रेन क्रमांक 02879 विशेष द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट दि. २४.१०.२०२० ते २.१२.२०२० पर्यंत दर बुधवार आणि शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी भुवनेश्वरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 02880 विशेष द्वि – साप्ताहिक सुपरफास्ट दि. २२.१०.२०२० ते ३०.११.२०२० पर्यंत दर सोमवार आणि गुरुवारी भुवनेश्वर येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल

थांबे व वेळ: बेलपहाड वगळता नियमित ट्रेन क्रमांक12879/12880 लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस प्रमाणे.

संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि २ द्वितीय आसन श्रेणी.

९. पुणे – संत्रागाची विशेष साप्ताहिक (१२ फे-या)

ट्रेन क्रमांक 02818 विशेष साप्ताहिक सुपरफास्ट २६.१०.२०२० ते ३०.११.२०२० पर्यंत दर सोमवारी पुण्याहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी संत्रागाचीला पोहोचेल.
ट्रेन क्र .02817 विशेष साप्ताहिक सुपरफास्ट २४.१०.२०२० ते २८.११.२०२० पर्यंत दर शनिवारी संत्रागाची येथून सुटेल आणि तिसर्‍या दिवशी पुण्यात पोहोचेल.

थांबे व वेळः नियमित रेल्वे क्रमांक 20821/20822 पुणे-संतरागाची सुपरफास्ट एक्सप्रेस प्रमाणे.

संरचनाः २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान.

आरक्षण : ट्रेन क्र. 02865, 05017, 02598 आणि 07318 गाड्यांसाठी बुकिंग १८.१०.२०२० रोजी पासून व 02811, 02858, 02546, 02818 and व 02879 या विशेष गाड्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर व www.irctc.co.in या वेबसाइटवर दि. २०.१०.२०२० रोजी वर उघडण्यात येणार आहे.

केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.