चक्रीवादळाच्या नुकसानीच्या पहाणीसाठी केंद्रीय पथकांची रायगड आणि पालघरमध्ये पाहणी

केंद्रीय पथके आज  रायगड  आणि पालघरमध्ये दाखल झाली असून त्यांनी पनवेल तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागातील माळडुंगी  या गावातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी घरावरील तुटलेले व उडून गेलेले पत्रे, घरावरील पडलेली कौले, समाज मंदिराचे झालेले नुकसान याची पाहणी केली. मदत पथकाने यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

    मुंबई:  तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी  दोन स्वतंत्र केंद्रीय पथके आज रायगड आणि पालघरमध्ये दखल झाले असून त्यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. कोकणात नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे पाच जिल्ह्यातील पडझडीत घरे, शेत, मंदिर, शाळा, गोठे व इतर अनेक बाबींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

    माळडुंगी  गावातील नुकसानीची पाहणी
    या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथके आज  रायगड  आणि पालघरमध्ये दाखल झाली असून त्यांनी पनवेल तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागातील माळडुंगी  या गावातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी घरावरील तुटलेले व उडून गेलेले पत्रे, घरावरील पडलेली कौले, समाज मंदिराचे झालेले नुकसान याची पाहणी केली. मदत पथकाने यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पनवेल तालुक्यातील असलेल्या वांगणी गावातील असलेल्या सील आश्रमाची पाहणी केली.

    मच्छीमार- शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा
    पालघर जिल्ह्यातील पालघर, सफाळे, सातपाटी, वडराई याठिकाणी पथकाने पाहणी केली. मच्छीमारांच्या तुटलेल्या बोटी, जाळी, घरे, शेतकऱ्यांच्या वाताहात झालेल्या बागा यांची त्यांनी यावेळी पाहणी केली . या दोन्ही पथकांसोबत दोन्ही जिल्ह्यातील महसूल, कृषी आणि पोलीस यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.