मंत्री जयंत पाटील
मंत्री जयंत पाटील

मुंबई (Mumbai).  केंद्राने शेतकऱ्यांचे आंदोलन योग्यप्रकारे हाताळले नाही, हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून आता स्पष्ट झाले असून कोट्यावधी शेतकऱ्यांना तीव्र वेदना दिल्याबद्दल केंद्राचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. कृषी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरुन जयंत पाटील यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

कृषी धोरणाविरोधी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या भूमिकेचे जयंत पाटील यांनी स्वागत केले शिवाय न्यायव्यवस्थेचे आभारही मानले. हा कृषीप्रधान देशाचा विजय आहे. केंद्राने शेतकऱ्यांचे हे आंदोलन योग्यप्रकारे हाताळले नाही असेही जयंत पाटील म्हणाले.