सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्य प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) ने आता एमएचटी सीईटी पाठोपाठ आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या अभ्यासक्रमांच्या चार सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक

 मुंबई : राज्य प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) ने आता एमएचटी सीईटी पाठोपाठ आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या अभ्यासक्रमांच्या चार सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. एमसीए, बी. एचएमसीटी, एम. आर्किटेक्चर, एम.एचएमसीटी परीक्षा आता १९ जुलै रोजी होणार आहेत.कोरोना विषाणूच्या संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता सीईटी सेलने मार्चमध्ये सर्व प्रकारच्या परीक्षांना स्थगिती दिलेली होती.

एमबीएनंतर एमसीए अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता एमसीए सीईटी बरोबर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नोलॉजी (बीएचएमसीटी) एम. आर्किटेक्चर, एम.एचएमसीटी या सीईटी परीक्षा १९ जुलै रोजी होणार आहे. एमसीए व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ३१ मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अशी माहिती आयुक्त संदीप कदम यांनी दिली आहे.
 
                                सीईटी आलेले अर्ज     अर्जाची मुदत   संभाव्य परीक्षा
एमसीए                       १८५५५                  मुदत संपली       १९ जुलै
बी. एचएमसीटी             २३४२                   ३१ मे पर्यंत         १९ जुलै
एम. आर्किटेक्चर            १३०७               ३१ मे पर्यंत            १९ जुलै
एम.एचएमसीटी             ३५                    ३१ मे पर्यंत           १९ जुलै