ओबीसी आरक्षणासाठी येत्या २६ जून रोजी राज्यात चक्काजाम आंदोलन; पंकजा मुंडे कडाडल्या

कजा मुंडे म्हणाल्या , मी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबात जो अन्याय झालाय तो दूर केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही. या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहोत. यासाठी येणाऱ्या काळात भाजप नेते प्रत्येक भागात जाऊन चर्चा करतील. येत्या 26 जूनला चक्काजाम आंदोलन करु. आम्ही न्यायालयातही याबाबत दाद मागणार आहोत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

    मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात 26 जूनला चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.

    दरम्यान पंकजा मुंडे म्हणाल्या , मी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबात जो अन्याय झालाय तो दूर केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही. या भूमिकेवर आम्ही सगळेजण ठाम आहोत. यासाठी येणाऱ्या काळात भाजप नेते प्रत्येक भागात जाऊन चर्चा करतील. येत्या 26 जूनला चक्काजाम आंदोलन करु. आम्ही न्यायालयातही याबाबत दाद मागणार आहोत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

    अजित पवारांवर पंकजा मुंडे चिडल्या…

    बीडमध्ये झालेल्या लाठीमाराच्या प्रकारावर पंकजा मुंडे यांनी तीव्र शब्दात नाराज व्यक्त केलीय. ‘हा सगळा प्रकार संतापजनक आहे. ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले. स्वत:च्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आले आहेत तर जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अजित पवारांची भेट घडवून आणणं तिथल्या स्थानिक नेत्यांचं काम होतं. त्यांनी ठरवलं असतं तर गोंधळ झाला नसता. मागण्या तर पूर्ण होत नाहीत, पण किमान भेट आणि बोलू द्यायला हवं होतं. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की आणि लाठीमार हे संतापजनक आहे. अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं’, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय.