येत्या २४ तासात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता-  हवामान खात्याने वर्तवला अंदाज

जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचाही संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे

    मुंबई: हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानुसार मागील दोन दिवसापासून राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याबरोबरच हवामान खात्याने येत्या २४ तासात पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. याबरोबरच पालघरयेथे रेड अर्लट ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

    मंगळवारपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली पहायला मिळाली. या जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचाही संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळतेय .