कोकणात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक तर ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे परतीच्या पावसाचे संकेत असून पश्चिम महाराष्ट्र हळूहळू पावसाचा जोर वाढू शकतो. असं हावामान विभागाच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

    मुंबई व कोकणासह राज्यातील काही भागात काल (शनिवारी) पावसाने हजेरी लावली. या पावसाने दुष्काळी भागातील बळीराजा सुखावला. मात्र, आता हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.

    भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) मुंबई केंद्राचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 48 तासांत उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारिचा उपाय म्हणून हवामान विभागाने आज रविवारी कोकणासह इतर जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

    हवामान विभागाने यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक तर ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे परतीच्या पावसाचे संकेत असून पश्चिम महाराष्ट्र हळूहळू पावसाचा जोर वाढू शकतो. असं हावामान विभागाच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

    भारतीय हवामान विभागाच्या निर्देशानुसार उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोकणात पुढील चार दिवसांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.