राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे या भागांमध्ये येत्या २४ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात १४ ते १५ सप्टेंबर रोजी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

मुंबई : राज्यात मागील काहीदिवसांपासून पावसानं (rains) विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा पावसाने पुनरागमन केले आहे. मुंबईतही पावसाची संततधार सुरु आहे. काही ठीकाणी पावसानं तुरळक तक काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. शनिवारी संध्याकाळी मुंबईसह उपनगरांत हलक्या सरींचा पाऊस पडला आहे. तर काही मध्यम स्वरुपात पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता (Chance of heavy rains) हवामान खात्याने वर्तविली (weather department forecast) आहे.

पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे या भागांमध्ये येत्या २४ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात १४ ते १५ सप्टेंबर रोजी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. तर १६ सप्टेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.