पुढील २४ तास हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरांत आकाश सामान्यता ढगाल राहून गडगडाह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबई महानगपालिकेच्या (BMC) आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने. १३ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२० पर्यंतचा पावसाळी परिस्थितीचा अहवाल (Report on rainy conditions) कुलाबा वेधशाळा हवामान केंद्राने जारी केला आहे. कुलाबा वेधशाळेने (Meteorological Department forecast) पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरांत आकाश सामान्यता ढगाल राहून गडगडाह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (rain) पडण्याची शक्यता आहे.

या अहवालात कुलाबा (Colaba ) वेधशाळेने वर्तवल्यानुसार गेल्या २४ तासात ६.० मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर वार्षिक सरासरी पाऊस २२९२ मिमी झाला आहे. संताक्रुझ हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर वार्षिक सरासरी २६६८ मिमी एवढी झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदाची जास्त पाऊस झाला आहे.

मनपाच्या स्वयंचलित केंद्रांवर नोंदविण्यात आलेल्या सरासरीनुसार मुंबई शहरात गेल्या २४ तासात १.१. पूर्ण उपनगरात ४.८, पश्चिम पनगरांत ८.४५ एवढा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई शहरात सरासरी पाऊस ११०.०२ टक्के तर उपनगरांत ९५.२८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

यंदा पाऊस चांगला झाल्याने काही महत्त्वाचे तलाव भरुन वाहू लागले आहेत. यातील तुळशी तलाव, विहार तलाव, मोडक सागर तलाव, तानसा तलाव पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. हे तलाव पावसामुळे भरुन वाहू लागले आहेत.  सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने ठिक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे झाड व फांद्यांचे तोडकाम सुरु आहे.