मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होत. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात देखील काही भागात मध्यम अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

    राज्यात कोकण किनारपट्टीसह काही भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यका हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या स्वरुपाच्या पावसाचा कोणताही धोका नसला तरी सतर्क रहाण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

    हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होत. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात देखील काही भागात मध्यम अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात पावसाचा काहिसा अधिक असेल असं देखील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी सांगीतलं आहे.

    हवामान विभागाने दिली ट्वीटद्वारे माहिती

    त्यामुळे या पावसाचा कोणताही धोका नसला तरी खबरदारी म्हणून नागरिकांनी सतर्क रहाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

    दरम्यान, कोकण किनारपट्टीला मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी मराठवाडा मात्र मागील दिड महिन्यांपासून पावसाच्या प्रतिक्षेत आहे.