राज्यात पुढील २ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, उत्तर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी

राज्यात उत्तरमहाराष्ट्रात काही भागांत पुढील ४८ तासांत मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक पावसाच्या सरी पडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशाराहीस देण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता (Chance of rain) वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरांत सलग तीन दिवस ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यने मुंबईत हलक्या पावसाच्या सरी शनिवारी रात्री पडत होत्या. राज्यात तुरळक पाऊस पडल्याने तापमानात कमालिचा घट नोंदविण्यात आला आहे.

राज्यात उत्तरमहाराष्ट्रात काही भागांत पुढील ४८ तासांत मेघगर्जनेसह (thunderstorm ) पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक पावसाच्या सरी पडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा (High alert) ही देण्यात आला आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पहिले कोरोना नंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठे शेतकरी सावरायला लागला होता. परंतु ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.