राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

राज्यात काही भागांत वादळी तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रासह राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता कायम आहे. आठवड्याभरापासून पावसाचे गैरहजरी होती मात्र काल पुणे शहराला आणि काही भागांना पावसाने झोडपले आहे.

मुंबई : राज्यात काही भागांत पावसाने मागील काही दिवस दडी मारली होती. त्यामुळे मुंबईसह उपनगरांत तापमानात कमालीची वाढ झाली होती. अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याने दक्षिण कोकण, मध्ये महाराष्ट्रातील घाटक्षेत्र आणि विदर्भात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात काही भागांत वादळी तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रासह राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता कायम आहे. आठवड्याभरापासून पावसाचे गैरहजरी होती मात्र काल पुणे शहराला आणि काही भागांना पावसाने झोडपले आहे.

नाशिकसह वदर्भातही पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ६ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर संपूर्ण राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर पुढील २ दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. वर्तवण्यात आली आहे.