पुढच्या २४ तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता ?

  • बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानातल्या या बदलांमुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 मुंबई:  पुढच्या २४ तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याची  माहिती समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानातल्या या बदलांमुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार, आज २ ऑगस्ट रोजी मुंबई, रायगड, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पुढील तीन दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच हवामानाच्या या बदलांमुळे सुमुद्र किनारा असलेल्या भागांमध्ये मोठा प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.