पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या आठवड्यात मुंबई परिसरात जोरदार पाऊस बरसला होता. त्यानंतर ३ ते ४ दिवसानंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र काल मंगळवार रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज १२ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई :  मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यासंह काल रात्रीपासून रिमझिम पावसाला सूरूवात झाली आहे. तसेच आज बुधवारी सुद्धा सकाळपासूनच राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. परंतु येत्या ४८ तासांत राज्यांतील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.   

गेल्या आठवड्यात मुंबई परिसरात जोरदार पाऊस बरसला होता. त्यानंतर ३ ते ४ दिवसानंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र काल मंगळवार रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज १२ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत उत्तर कोकण आणि गोव्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे येत्या २४ तासांत पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेश या ऱाज्यातील काही भागांत तुरळक आणि विजांच्या कडकडांटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.