येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यात दिला रेड अलर्ट

कोकणमधील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात वाऱ्याचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे. ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

    मुंबई: राज्यात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मान्सून सक्रिय झाल्याने काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावस पडेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेड अर्लटचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पुण्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

    आज शनिवारी पुण्यात पावसाची शक्यता असून ११, १२ आणि १३ जुलै या तीन दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे. येथे मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणमधील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात वाऱ्याचा वेगही जास्त असण्याची शक्यता आहे. ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. येथे ऑरेंज अलर्टचा (Orange Alert) इशारा देण्यात आला आहे. विजांसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये किंवा झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहन करण्यात आला आहे.

    आयएमडीच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्रापासून दक्षिण-पश्चिम वारा आणखी वेग घेण्याची शक्यता आहे.११ जुलैच्या सुमारास बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता असल्याने पुढील पाच दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडेल.