पुढील २४ तासांत राज्यातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु काही भागांत हलकी रिपरिप सुरुच होती. तर आता पुढील २४ तासात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात गेले काही दिवस पावसाने दडी मारली आहे. परंतु पुढील २४ तासात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता (Chance of torrential rain) हवामान खात्याने वर्तवली आहे. मुबईसह उपनगरांत काही भागांध्ये हलक्या व तुरळक पावसाचा अंदाज वर्तवला (Rainfall forecast) आहे. तर रायगड, ठाणे आणि पश्चिम भागांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु काही भागांत हलकी रिपरिप सुरुच होती. तर आता पुढील २४ तासात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वेधशाळेने पुढील २४ तासांत मराठवाडा, विदर्भ आणि कोकोणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.