महापुराचा फटका बसल्यानंतर कोकणामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात दोन दिवस सर्वत्र पाऊस असणार, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. नाशिक, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस हा नाशिक आणि पालघरमधल्या काही भागात पडण्याची शक्यता आहे.

    मुंबई : विश्रांती घेतलेल्या मान्सूनने राज्यात पुन्हा एकदा चांगली हजेरी लावली. पुढील दोन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेजं अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात दोन दिवस सर्वत्र पाऊस असणार, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. नाशिक, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस हा नाशिक आणि पालघरमधल्या काही भागात पडण्याची शक्यता आहे.

    गेल्या 3 दिवसांपासून विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिक वाळू लागली होती. तसेच ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते मात्र, वेळेवर पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे. पाऊस पडत असल्याचने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, त्यामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

    दरम्यान, महापुराचा फटका बसल्यानंतर कोकणामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल, असा हवामान खात्याने म्हटले आहे.