राज्यात ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. विदर्भासह मराठवाड्यात पावसाची दमदार बॅटींग सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई : राज्यात मागील काही दिवस पावसाने दडी मारली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पुन्हा धुव्वादार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात काही भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. (Chance of torrential rains in ‘these’ parts of the state) पालघर, ठाणे, नाशिक, नगर जिल्ह्यात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच मुंबईतही काही भागांत मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तसेच विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. विदर्भासह मराठवाड्यात पावसाची दमदार बॅटींग सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती मिळत आहे.

वैनगंगा नदीला पूर आल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद करण्यात आला आहे. चंद्रपुरचा दक्षिण गडचिरोलीसोबत असलेल्या गावांचा संपर्क तुटला आहे. सतत बरसत असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे.