मुंबईसह ‘या’ जिल्हयांत मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर मुसळधार तर मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. तसेच आपापली काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई : राज्यात मागील २ दिवसांपासुन पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे बळीराजा मात्र सुखावले ला आहे. मुंबईसह उपनगरांत काल पावसाची रीपरीप सुरु होती. मात्र शुक्रवारी सकाळीपासुन मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तिकडे कोकण किनारपट्टीवरही चांगला पाऊस पडल्याचे समजते आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवर मुसळधार तर मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. तसेच आपापली काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. 

मागील २४ तासांत मुंबईसह उपनगरांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील अनेक भागांत ६५ ते ११५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरांत १० ते १० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे. पालघर, नंदुरबार, आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात अतिमुसळघार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.