राज्यातील काही भागांत पुढील पाच दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता ; मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांचा कडकडाट होणार

विदर्भात २६ एप्रिलनंतर वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा अंदाज आहे.

    मुंबई : महाराष्ट्रात रविवारपासून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या सर्वत्र हवामान कोरडे आहे. मात्र, संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २५ एप्रिलपासून चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस आणि विजांचा कडकडाट होणार आहे. या दोन्ही विभागात २७ एप्रिलनंतर सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे.

    विदर्भात २६ एप्रिलनंतर वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. कोकणातही पावसाचा अंदाज आहे.