Heavy rains lashed the state red alert to Mumbai and Konkan

राज्यात पुढील १० दिवस थंडीचा पारा चढ उतार राहणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळास अनुकूल वातावरण तयार होताना दिसत असल्यामुळे थंडी आणि पावसाची शक्यता आहे. यामुळे वातावरणातील गारवा वाढणार आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश या भागात बाष्पयुक्त वातावरण राहिल.

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागांत अवकाळी पावसाने (unseasonal rains ) हजेरी लावली आहे. पुढील २४ तास ढगाळ वातावरणासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Meteorological Department forecast) आहे. तसेच अनेक दाट धुके पडणार असल्यामुळे अनेक जिल्ह्यातील वाहन चालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

राज्यात पुढील १० दिवस थंडीचा पारा चढ उतार राहणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळास अनुकूल वातावरण तयार होताना दिसत असल्यामुळे थंडी आणि पावसाची शक्यता आहे. यामुळे वातावरणातील गारवा वाढणार आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश या भागात बाष्पयुक्त वातावरण राहिल.

राज्यात हवामानात सतत बदल होत आहे. त्यामुळे तापमानातही चढ उतार होत आहे. यामुळे ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावतीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील काही भागांत तुऱळक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत पडले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. अवकाळी पावसाचा फळबाग, आणि बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.