मुख्यमंत्री फक्त सरकार वाचवण्यात मग्न, चंद्रकांत पाटलांचा आरोप

कोरोनाच्या रुग्ण संख्येत(corona patients) दिवसेंदिवस उच्चांकी वाढ असताना केवळ लॉकडाऊनचा इशारा देऊन या गंभीर सकंटाकडे महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. केवळ सध्याच्या राजकीय घडमोडींमध्ये अस्थिर झालेले सरकार पडू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakre)यांची धडपड सुरु असल्याची घणाघाती टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील(chandrakant patil) यांनी केली.

    मुंबई : कोरोनाच्या रुग्ण संख्येत(corona patients) दिवसेंदिवस उच्चांकी वाढ असताना केवळ लॉकडाऊनचा इशारा देऊन या गंभीर सकंटाकडे महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. केवळ सध्याच्या राजकीय घडमोडींमध्ये अस्थिर झालेले सरकार पडू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची धडपड सुरु असल्याची घणाघाती टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केली.

    सोशल डिस्टन्स नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये लॉकडाऊनचा इशारा देताना, जर प्रशासनाचे नियम पाळले नाहीत; तर २ एप्रिलनंतर पुण्यात लॉकडाऊन करावेच लागेल असा धाक उपमुख्यमंत्र्यांनी दाखविला. याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “महाभकास आघाडी सरकारने आपली नैतिकता गमवली असून, जनतेला उपदेश द्यायचा त्यांना अधिकार राहिलेला नाही.”

    ते पुढे म्हणाले की, “पंढरपूरमधील पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भरगच्च मेळावा झाला. तेच उपमुख्यमंत्री आज लॉकडाऊनचा इशारा कसा देऊ शकतात?” असा सवाल त्यांनी यावेळी अजितदादांना विचारला. तसेच, त्यांचे मित्रपक्ष सुद्धा राज्यातील विविध भागात मेळावे, बैठका बिनधास्तपणे घेत आहेत. यामधून सोशल डिस्टंन्सिंगचा पूर्णपणे फज्जा फडाला असतानाच हे महाभकास सरकार कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन जनतेला कोणत्या तोंडाने देत आहेत, अशी टिकाही पाटील यांनी यावेळी केली आहे.

    कोरोना वाढ चिंताजनक गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. देशातील अन्य राज्यांची तुलना करताना दुदैर्वाने महाराष्ट्र कोरोनाच्या वाढीमध्ये आघाडीवर असल्याचे निदर्शनास आणून देताना चंद्रकांतदादा पाटील यांनी सविस्तर आकडेवारीच सादर करताना सांगतिले की, “१६ मार्च रोजी महाराष्ट्रात १७,८६४ रुग्ण होते. तर उर्वरित भारतात हाच आकडा ११,०३९ इतका होता. १७ मार्च रोजी महाराष्ट्रात २३,१७९ रुग्ण होते तर उर्वरित भारतात हा आकडा १२,६९२ इतका होता. १८ मार्च रोजी महाराष्ट्रात २५,८३३ रुग्ण होते. तर उर्वरित भारतात हा आकडा १३,८९३ इतका होता. १९ मार्च रोजी महाराष्ट्रात २५,६८१ रुग्ण होते. तर उर्वरित भारतात हा आकडा १५,२७२ इतका होता. २० मार्च रोजी महाराष्ट्रात २७,१२६ रुग्ण होते, तर उर्वरित भारतात हा आकडा १६,७२० इतका होता. २१ मार्च रोजी महाराष्ट्रात ३०,५३५ रुग्ण होते, तर उर्वरित भारतात हा आकडा १६,४१६ इतका होता. २२ मार्च रोजी महाराष्ट्रात २४,६४५ रुग्ण होते, तर उर्वरित भारतात हा आकडा १६,०७० इतका होता. २३ मार्च रोजी महाराष्ट्रात २८,६९९ रुग्ण होते, तर उर्वरित भारतात हा आकडा १८,५६३ इतका होता. २४ मार्च रोजी महाराष्ट्रात ३१,८५५ रुग्ण होते, तर उर्वरित भारतात हा आकडा २१,६२१ इतका होता. २५ मार्च रोजी महाराष्ट्रात ३५,९५२ रुग्ण होते, तर उर्वरित भारतात हा आकडा २३,१६६ इतका होता.”

    महविकास आघाडी महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात व उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहेत. आजही महाराष्ट्रात योग्य प्रमाणात कोविड सेंटर उपलब्ध नाहीत. हजारो कोविड रुग्णांवर नीट उपचार होत नसल्याचे स्पष्ट करतानाच ते म्हणाले की, “कोविड रोखण्यात अपयशी ठरल्याबदंदल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच कॉंग्रसेचे नेते व वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दिसत नाही. कारण, या मंत्र्यांवर कारवाई केली; तर सरकार पडण्याची भीती मुख्यमंत्र्यांना वाटत आहे. जर मुख्यमंत्र्यांना राज्यातील कोटयवधी जनतेच्या आरोग्याची काळजी असेल, तर कोरोना रोखण्यात अपयशी ठरलेल्या या दोन्ही मंत्र्यांविरुध्द कारवाईचे पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलले पाहिजे, असे आवाहनी चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

    विशेष म्हणजे, महाराष्ट्रामध्ये कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाटयाने वाढत असताना ठाकरे सरकार मात्र सत्तेच्या लालसेपोटी फक्त आपल्या सरकारची काळजी वाटत असल्याची टीका करतानाच चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकाराला इशारा दिला की, “येत्या आठवड्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यात सरकार अपयशी ठरले, तर भाजपाच्या वतीने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनाकडे जाऊन केंद्र सरकारला या गंभीर संकटावर तोडगा काढण्याची विनंती करण्यात येईल.”