देशातील पहिल्या महिला क्रिकेट समालोचक चंद्रा नायडू यांचे निधन

चंद्रा नायडू यांनी वडील सी के नायडू यांच्या जीवनावर 'सीके नायडू ए डॉटर रिमेम्बर्स' नावाचे पुस्तक देखील लिहिले होते. तसेच, मध्य प्रदेशच्या क्रिकेटमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.

    मुंबई : भारतीय क्रिकेटमधील पहिल्या महिला समालोचक चंद्रा नायडू यांचे रविवारी निधन झाले. प्रदीर्घ काळापासून त्या आजारी होत्या. 88 वर्षीय चंद्रा नायडू पहिले कसोटी कर्णधार असलेले सीके नायडू यांच्या मुलगी होत्या. मनोरमागंजमधील घरी चंद्रा यांनी शेवटचा श्वास घेतला. माजी खेळाडू आणि चंद्रा नायडू यांचे नातेवाईक विजय नायडू यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

    चंद्रा नायडू या भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार सीके नायडू यांच्या कन्या होत्या. त्यांनी समालोचन क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. भारतीय क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळात समालोचक म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

    चंद्रा नायडू यांचे योगदान ?

    दरम्यांन १९७७ रोजी चंद्रा नायडू यांनी ‘नॅशनल चॅम्पियन्स बॉम्बे’ आणि ‘एमसीसी’ या दोन संघांमध्ये आयोजित सामन्यात समालोचन केले होते. पुरुष प्रधान समालोचन क्षेत्रात त्यांनी मोजकेच पण उल्लेखनीय काम केले आहे. भाषेवरील त्यांची पकड आणि शब्दफेक उत्तम होती. तसेच, त्यांनी इंदुरमधील शासकीय कन्या महाविद्यालयातही इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून काम केले होते. १९८२मध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड संघादरम्यान झालेल्या सुवर्ण जयंती कसोटी सामन्याच्यावेळी एका कार्यक्रमला चंद्रा यांनी संबोधित केले होते. चंद्रा नायडू यांनी वडील सी के नायडू यांच्या जीवनावर ‘सीके नायडू ए डॉटर रिमेम्बर्स’ नावाचे पुस्तक देखील लिहिले होते. तसेच, मध्य प्रदेशच्या क्रिकेटमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.