शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली, चंद्रकांत पाटलांचा टोला

मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे. काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असले तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवे होते. अनिल देशमुखांचेही असेच चालले आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. रांगेने एक-एक मंत्री आहे. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब असे पाटील म्हणाले.

    नागपूर: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आज (मंगळवार) ईडीने अनिल परब यांनी उपस्थित राहण्यास सांगितले होेते. परंतु परबांनीही अनिल देशमुखांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांनी सुद्धा ईडी कार्यालयात प्रत्यक्ष हजर न राहता वकिलांमार्फत जबाब पाठवला. दरम्यान, शिवसेनेवर जोरदार टिका करतानाच शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. अनिल परब यांनी ईडी चौकशीसाठी हजर राहायला हवे होते, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

    मंत्र्यांची अजून मोठी यादी

    मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे. काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असले तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवे होते. अनिल देशमुखांचेही असेच चालले आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. रांगेने एक-एक मंत्री आहे. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब असे पाटील म्हणाले.

    राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

    ठाण्यात एका फेरिवाल्याने महिला अधिकाऱ्याची बोटे छाटण्याचा प्रकार घडला. त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला. राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले, पण त्यांना अजून अटक नाही. संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. तो खटला चालवायला हवा आणि संपवायला हवा. आता एक फेक केस तयार करुन त्यात क्लीन चीट मिळाली. ती केस पूजा चव्हाण केससोबत जोडून गैरसमज पसवण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. अनिल देशमुख यांच्या क्लीनचिट बाबतही असेच झाल्याचे पाटील म्हणाले.