शरद पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांंनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले की…

केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांमुळे राजकीय वातावरण चांगलेच चिघळले आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना देखील बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. दरम्यान यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांमुळे राजकीय वातावरण चांगलेच चिघळले आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना देखील बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

    दरम्यान यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की,’शरद पवार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर या देशात पहिल्यांदाच धाडी पडल्या आहेत, असं जे बोललं जात आहे. इनकम टॅक्स धाड पडणं, सीबीआयची चौकशी होणं किंवा ईडीनं कारवाई करणं हे कॉमन आहे. बाकीच्या ठिकाणी झालं तर चालतं. तुमच्यावर धाडी पडल्या तर हा सूड उगवण्याचा भाग आहे. हे अधिक वेळ थांबले आहेत, हे पाहुणचार घेत आहेत. अशा प्रकारे म्हणणं बरोबर नाही. पण पुन्हा एकदा त्यांनी ज्या यंत्रणांबद्दल बोललं आहे. त्यांनी त्याचं उत्तर द्यावं.’ असं ते म्हणाले.

    शरद पवार काय म्हणाले होते?

    मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना पवार म्हणाले होते की,’गेल्या सहा दिवसांपासून पवार कुटुंबीयांपैकी काहींच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी देखील सलग ५ ते ६ दिवस छापे टाकण्यात आले. यावरून केंद्रीय यंत्रणांचा केंद्र सरकार राजकीय फायद्यासाठी गैरवापर करत असल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधकांकडून केला जात आहे. तसेच पाहुण्यांनी पाहुणचार घ्यावा, पण अजीर्ण व्हावं, इतका पाहुणचार घेऊ नये’ असेही पवार म्हणाले होते.