मोफत लसीकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत केले स्वागत

त्यांनी दुसऱ्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारने एकजुटीने अश्याच प्रकारे एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की कोरोनाच्या लढाईत लसीकरण हा शेवटचा उपाय न समजता सर्वांनी मुखपट्टी आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

    मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी राज्य सरकारच्या १८ ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत ट्विट केले आहे. राज्यातील पाच कोटी ७१ लाख जनतेला दिलासा देणाऱ्या या निर्णयाचे स्वागत असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी दुसऱ्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारने एकजुटीने अश्याच प्रकारे एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की कोरोनाच्या लढाईत लसीकरण हा शेवटचा उपाय न समजता सर्वांनी मुखपट्टी आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले आहे.