मोदींच्या नावे मतं मागून आमचा विश्वासात केला ; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला

चंद्रकांत पाटील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जालना शहरातील कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाऊन घेतायत.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.आमच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवून त्या जिंकून दाखवू असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

    भाजपची ताकद आता वाढली असून भाजपा मित्रपक्षांना सोबत घेऊन यापुढे सर्व निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढवेल असं सांगत ज्यांनी मोदींच्या नावावर मते मागितली आणि आमचा विश्वासात केला अशा विश्वास घातक्यांबरोबर आम्हाला काम करायचं नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला हाणला आहे.

    पाटील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जालना शहरातील कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाऊन घेतायत.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.आमच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवून त्या जिंकून दाखवू असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

    जावेद अख्तर यांच्यावर देखील त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडलं जावेद अख्तरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुराष्ट्र कळलं नाही असं म्हणत त्यांनी अख्तर यांच्यावर टीका केली.मनसे सोबत युतीचा विषय झालेला नाही असं सांगत राज ठाकरे यांच्यासोबत नाशिकमध्ये अचानक भेट झाली होती असंही ते यावेळी म्हणाले.मात्र मंदा म्हात्रे यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राज्यपालांकडे पाठवलेले 12 नावं हे काही तालिबानी प्रशिक्षण घेऊन आलेले नाही या संजय राऊत यांच्या विधानावर ते काहीही बोलू शकतात मि त्यावर अधिक बोलनार नाही असं सांगत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.वैद्यनाथ कारखान्याच्या मॅनेजरला अटक केली हे मला माहित नाही असं सांगत हा तपासाचा भाग आहे त्याबद्दल मला अधिक बोलता येणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.

    कोरोनाच्या निर्बंधाचं कारण देऊन सरकारला लोकांना जास्त दिवस वेठीस धरता येणार नाही असं सांगत अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयचं काम सीबीआयला करू द्या असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी आणि जावयाविरोधात आरोपपत्र दाखल केलंय याबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला.