automatic door double decker buses available in best for mumbaikers

बेस्ट(Best) उपक्रमातील बसमार्गात बदल(Change In Best Bus Route) करण्यात आले आहेत. उपक्रमाने ४ बस मार्ग आजपासून रद्द(4 Route Cancelled) केले आहेत. तसेच १८ मार्गाचे विलीनीकरण केले आहे.

    मुंबई : बेस्ट(Best) उपक्रमातील बसमार्गात बदल(Change In Best Bus Route) करण्यात आले आहेत. उपक्रमाने ४ बस मार्ग आजपासून रद्द(4 Route Cancelled) केले आहेत. तसेच १८ मार्गाचे विलीनीकरण केले आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत.

    बेस्ट उपक्रमाच्या सर्व बसमार्गाचा नियमितपणे आढावा घेण्यात येतो आणि बसप्रवर्तनातील अडचणी प्रवाशांच्या सुचना इत्यादी बाबी विचारात घेऊन आवश्यकता वाटल्यास उपक्रमाच्या बससेवेत बदल करण्यात येतात. जेणेकरुन प्रवाशांना जास्तीत जास्त समाधानकारक बससेवा देणे शक्य होते. मात्र, मार्च २०२० पासून कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रमाच्या बस प्रवर्तनात अनेक तात्कालिक – प्रासंगिक बदल करावे लागल्यामुळे नियमित बसप्रवर्तनाचा आढावा घेणे बेस्टला शक्य झाले नव्हते.

    बदलत्या परिस्थितीचा विचार करुन उपक्रमाच्या बस सेवेचा आढावा घेण्यात घेऊन आवश्यक बदल करण्यात आले आहेत. या प्रवर्तनात्मक बदलांची अंमलबजावणी उध्या बुधवार ,१ सप्टेंबर २०२१ पासून करण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन काही नवीन बसमार्ग सुरु करण्यात येत आहेत.तसेच अनेक विद्यमान बसमार्गाच्या प्रवर्तनात बदल करण्यात आले आहेत.

    बेस्ट उपक्रमाने २० मर्यादित,४३, ६१ आणि ए – ३२९ हे बस मार्ग रद्द केले आहेत.तर त्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून या २० मर्यादित साठी सी- १० किडवाई मार्गावर नवीन बसमार्ग सुरू केला आहे. तसेच बसमार्ग ४३ साठीही हाच पर्यायी नवीन बस मार्ग असणार आहे. बस मार्ग ६१ साठी ६६ -दक्षिण मुंबई, ४६,४५,२१२ – वडाळा ते माहीम हे पर्यायी बस मार्ग असतील. तसेच बस मार्ग ए – ३२९ ला ५३३ मर्यादित हा पर्यायी मार्ग असणार आहे.त्याच बरोबर १८ मार्गाचे विलीनीकरण केलेले आहे व त्याला पर्यायी नवीन तसेच जुने मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.

    ते बसमार्ग असे : बस मार्ग सी- ६ ला( पर्याय मार्ग -सी -२१ पूर्व मुक्त मार्गावर संपूर्ण दिवस उपलब्ध)एसी – ८ ला ( पर्यायी मार्ग – सी- २१ पूर्व मुक्त मार्ग) बिकेसी – १० ला ( पर्यायी मार्ग – सी – ७१,सी – ७२, ४४० मर्यादित),बिकेसी- १२ ला ( पर्यायी मार्ग – सी – ५५),बिकेसी – १३ ला (पर्यायी मार्ग – ३०३), बिकेसी- १६ ला (पर्यायी मार्ग – १८१), १६ मर्यादितला ( पर्यायी मार्ग – ३५१, ३६९), ३० मर्यादितला (पर्यायी मार्ग – ६६, ३०२), सी – ५० ला (पर्यायी मार्ग – सी – २१ पूर्व मुक्त मार्ग), ६२ ला (पर्यायी मार्ग -सी – ५४, ३२२), ७६ ला (पर्यायी मार्ग -६६,८८,१४,१५), १७३ ला (पर्यायी मार्ग – ४६३,१७६), २२९ ला( पर्यायी – सी -१२,७९,२२४),३०६ मर्यादितला (पर्यायी मार्ग – ३२२,५१७ मर्यादित, ३०२ ,३०३), ३०९ मर्यादितला ( पर्यायी मार्ग – ३३२, ४७० मर्यादित,३२६ मर्यादित,४६१ मर्यादित), ४४८ मर्यादितला ( पर्यायी मार्ग – ३४८ मर्यादित), ४५८ मर्यादितला ( पर्यायी मार्ग – ४९६ मर्यादित, ४६१ मर्यादित,४५९ मर्यादित, ४६९ मर्यादित), ४९१ मर्यादित ला (पर्यायी मार्ग — ७०० मर्यादित, ७०६ मर्यादित) मार्गांतील बदल असे आहेत.