Changes in Governor-appointed list: Eknath Khadse's name dropped along with Raju Shetty; In the role of NCP withdrawal due to strong objections of BJP

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत वगळण्यात आल्याची चर्चा असणारे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीं यांच्यासह दुसरे नाव एकनाथ खडसेंचे आहे. या नावाला भाजपचा तीव्र आक्षेप असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने माघार घेण्याची भुमिका घेतली तर खडसेंच्या ऐवजी त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावावर सहमती होण्याची शक्यता असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात केली जात आहे.

  मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत वगळण्यात आल्याची चर्चा असणारे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीं यांच्यासह दुसरे नाव एकनाथ खडसेंचे आहे. या नावाला भाजपचा तीव्र आक्षेप असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने माघार घेण्याची भुमिका घेतली तर खडसेंच्या ऐवजी त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावावर सहमती होण्याची शक्यता असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात केली जात आहे.

  एकनाथ खडसे यांच्या नावालाही आक्षेप

  विधान परिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित १२ जागा गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त असून राज्य मंत्रिमंडळाने गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये या १२ नावांची यादी शिफारसीसह राज्यपालांकडे पाठवली आहे. दहा महिन्यांनंतरही राज्यपालांनी या यादीबाबत नुकतीच मुख्यमंत्र्सह  महाविकास आघाडीच्या नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी चार नावांना आक्षेप घेतला असून त्याशिवाय राजकीय आक्षेपातून भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या नावालाही आक्षेप असल्याने त्या नावाबाबतही राष्ट्रवादी माघार घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खडसेंचे नाव राष्ट्रवादीने वगळले नसले तरी तिढा सोडविण्यासाठी सामंजस्याचा तोडगा म्हणून आक्षेप घेतला गेलाच तर त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसेंचे नावाला मान्यता घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  रोहिणी खडसेंचे नाव चर्चेत

  खडसेंच्या नावावर आक्षेप असल्याने त्यांच्या वाढदिवशीच राज्यपालांकडून यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता टळ ल्याचे सांगण्यात येत आहे.तर दुसरे नांव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीं यांचे असून त्यांच्या नाव वगळल्याचीच सर्वाधिक चर्चा होत राहिली आहे. मात्र  खडसेंच्या नावावरील संभाव्य आक्षेप लक्षात घेता रोहिणी खडसेंचे नाव चर्चेत आले आहे.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]