The renaming of schools after cities and airports; All Mumbai Municipal Corporation schools will be renamed

४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याबाबतचा(reopening of schools in maharashtra) अध्यादेश शिक्षण विभागाने निर्गमित केला असला तरी मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे असतानाही मुंबईतील अनेक शाळांनी शिक्षकांना सोमवारपासून शाळेमध्ये उपस्थित राहण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मुंबई :  ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याबाबतचा(reopening of schools in maharashtra) अध्यादेश शिक्षण विभागाने निर्गमित केला असला तरी मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे असतानाही मुंबईतील अनेक शाळांनी शिक्षकांना सोमवारपासून शाळेमध्ये उपस्थित राहण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत मुंबई मनपा आयुक्तांना अधिकार दिले आहेत. सोमवारी मुंबई मनपा शिक्षण अधिकारी मनपा आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करतील त्यावर आयुक्त कोणता निर्णय घेता याकडे मुंबईतील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नसतानाही मुंबईतील अनेक शाळा प्रशासनाने शिक्षकांना सोमवारपासून शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकीकडे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवायचे तर दुसरीकडे शाळेमध्ये पोहचण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याने शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    याबाबत शिक्षण विभागाने कोणतेही आदेश काढलेले नसताना शिक्षकांना शाळेत कशासाठी बोलावले ? असा प्रश्न भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतील शाळा सुरू झाल्याची घोषणा झाल्यावर शिक्षक दोन दिवस आधी तयारीसाठी शाळेत येतील.

    शाळा सुरू करण्याबाबत आयुक्तांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून तो पर्यंत शिक्षक ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवतील असेही बोरनारे यांनी सांगितले. शाळांच्या मनमानी कारभाराबाबत आपण शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुंबईतील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्यात येतील, असा अंदाज शिक्षणक्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.