अर्णब गोस्वामींविरोधातील केस बंद, हे आहे कारण

पालघर हत्याकांड आणि वांद्रेतील श्रमिकांच्या गर्दीविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकऱणी रिपब्लिक वाहिनीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात चॅप्टर केस दाखल करण्यात आली होती. मात्र सहा महिने होऊनही त्यावर कुठलाच निकाल न लागल्याने ही केस बंद करण्यात आली. सीआरपीसीच्या कलम १०८ नुसार केस दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली होती.

    रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली चॅप्टर केस अखेर बंद करण्यात आलीय. सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांनी शनिवारी हा आदेश दिला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात गोस्वामींविरोधात ही केस दाखल करण्यात आली होती.

    पालघर हत्याकांड आणि वांद्रेतील श्रमिकांच्या गर्दीविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकऱणी रिपब्लिक वाहिनीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात चॅप्टर केस दाखल करण्यात आली होती. मात्र सहा महिने होऊनही त्यावर कुठलाच निकाल न लागल्याने ही केस बंद करण्यात आली. सीआरपीसीच्या कलम १०८ नुसार केस दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली होती. अर्णब यांना कारणे दाखवा नोटिस बजावून भविष्यात असा प्रकार घडणार नाही, असा बॉंड का लिहून घेण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली होती.

    पालघर हत्याकांड आणि वांद्रेतील गर्दी या मुद्द्यांवरून हिंदु आणि मुस्लिमांमध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोस्वामी यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकऱणी ना. म. जोशी पोलीस स्थानक आणि पायधुनी पोलीस स्थानकात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

    नियम काय आहे?

    असामाजिक घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चॅप्टर केसचा उपयोग करण्यात येतो.  मात्र नियमानुसार चॅप्टर केसचा निर्णय सहा महिन्यांत लागला नाही, तर ती केस बंद करावी लागते. या नियमानुसार ही केस बंद करण्यात आली आहे. सहा महिने होऊनही केस सुरू असल्याने ती बंद करण्यात यावी, असा अर्ज गोस्वामी यांच्या वकिलाकडून करण्यात आला. त्यानंतर ही केस बंद करण्यात आली.