टीआरपी घोटाळ्यात अखेर दोषारोपपत्र दाखल

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आतापर्यंत १२ जणांना याप्रकऱणात अटक केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी बार्क या संस्थेने हंसा रिसर्च ग्रुपच्या वतीने याबाबत पोलिसांत गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात टीआरपीमध्ये फेरफार करून तो वाढवण्याचे प्रयत्न झाल्याचं उघड झालं होतं.

टीआरपी घोटाळाप्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल केले.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आतापर्यंत १२ जणांना याप्रकऱणात अटक केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी बार्क या संस्थेने हंसा रिसर्च ग्रुपच्या वतीने याबाबत पोलिसांत गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात टीआरपीमध्ये फेरफार करून तो वाढवण्याचे प्रयत्न झाल्याचं उघड झालं होतं.

या प्रकऱणात रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन वाहिन्यांविरोधात पोलिसाना पुरावे आढळले होते. सुरुवतीला फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांच्या मालकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीनुसार इतर काही संशयितांना पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत एकूण १२ जणांना याप्रकऱणी पोलिसानी अटक केलीय.

काही दिवसांपूर्वीच ईडीनेही याप्रकरणी ईसीआर नोंदवला आहे. मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याची दखल घेत ईडीनंही त्यांच्या पातळीवर या प्रकरणात लक्ष घालायला सुरुवात केली आहे.