BMC

चर्नीरोड पुलाचे (Charni Road Bridge Work)काम अखेर पूर्ण झाले आहे. मात्र जुन्या पुलापेक्षा नवीन पुलाची रुंदीही कमी झाल्यामुळे ये- जा करताना गर्दीला होते. त्यामुळे समाधानकारक काम न झाल्याने गिरगावकरांमध्ये(Girgaon) नाराजी आहे.

    मुंबई: गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या चर्नीरोड पुलाचे (Charni Road Bridge Work)काम अखेर पूर्ण झाले आहे. मात्र जुन्या पुलापेक्षा नवीन पुलाची रुंदीही कमी झाल्यामुळे ये- जा करताना गर्दीला होते. त्यामुळे समाधानकारक काम न झाल्याने गिरगावकरांमध्ये(Girgaon) नाराजी आहे.

    चर्नीरोड रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूल जुना धोकादायक झाल्याने तो पाडून नवीन पूल बांधण्याचे काम २०१६ मध्ये मुंबई पालिकेने(BMC) हाती घेतले. पुलाचे काम दोन वर्षात म्हणजे २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली होती. मात्र विविध कारणे, समस्या आल्याने काम रखडत गेले. अखेर तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर जुलै २०२१ मध्ये हे काम पूर्ण झाले आहे. चालताना पादचाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी नवा पूल बांधताना त्यावर छप्पर टाकण्याची मागणी तत्कालीन शिवसेना नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी पालिकेकडे केली होती. ती पालिकेने मान्य केली होती. मात्र पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी अजूनही प्रशासनाने मान्य केल्यानुसार पुलावर छप्पर टाकण्यात आलेले नाही. शिवाय जुन्या पुलापेक्षाही नवीन पुलाची रुंदीही कमी झाली आहे. अरुंद पुलामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. याकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी पालिकेच्या पूल विभागाचे लक्ष वेधले आहे.

    या ठिकाणच्या जुन्या पुलावरून डॉ. भालेराव मार्ग, साहित्य संघ, केळेवाडीतून गिरगावात जाण्यासाठी पूर्वी जुना जोड पूल होता. तो पूल देखील धोकादायक ठरल्याने पाडण्यात आला. रेल्वे स्थानकाचा नवीन पूल बांधण्यात आला तरी गिरगावात जाणारा पूल बांधण्यात न आल्यामुळे रेल्वेने आलेले प्रवासी महर्षी कर्वे मार्गावरून रस्ता ओलांडून केळेवाडीमार्गे गिरगावात जातात. कर्वे रोडवरील वाहतुकीतून प्रवाशांना मार्ग काढावा लागतो. याठिकाणी रस्ता ओलांडताना अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे हा पूल तातडीने बांधण्याची मागणीही गिरगावकरांनी केली आहे.