Charter Private Jet at Nagpur

    नागपूर : देशाच्या 74 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका भारतीय कंपनीने परदेशातून आयात केले आहे. लवकरचं हे विमान भारतीयांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पहिले चार्टड विमान गुरुवारी नागपूर येथील मिहान सेझ मधील एअर इंडियाचा MRO मध्ये आज दाखल झाले.

    यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जेट सेट गो कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कणीका टेकेरेवार, जिल्हाधिकारी यांचा सह एअर इंडियाचे अधिकारी उपस्थित होते.

    पालकमंत्री नितीन राऊत यांनी विमानाची पाहणी केली. गुजरातच्या जेट सेट गो या कंपनीचे हे हॉकर 800 हे चार्टड विमान असून 3.2 मिलियन डॉलरला याची खरेदी केली आहे.  हे विमान आता नागपूरातुन भाडेतत्त्वावर दिले जाणार आहे.

    आत्तापर्यंत देशातील कोणत्याही व्यक्तीला किंवा कंपन्यांना भाडेतत्त्वावर चार्टड विमान हवं असल्यास त्याला परदेशातून विशेषतः आयर्लंड येथुन घ्यावे लागत होते. जे फार खर्चिक होते. मात्र, केंद्र सरकारने हवाई वाहतूक क्षेत्रात अनेक नियम शिथिल केल्यानंतर आता देशातीलच कंपन्या चार्टड विमाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत.

    भारतीय कंपनी आता भाडेतत्वावर चार्टड विमान देण्यासाठी पुढे आल्यामुळे परकीय चलनाची मोठी बचत होणार आहे. शिवाय खाजगी कंपन्यांचे विमान नागपूरातील MRO मध्ये दाखल होत असल्याने हवाई क्षेत्रात नागपुर आगेकूच करीत असल्याचे दिसत आहे.