Chhagan Bhujbal's reaction regarding Urmila Matondkar's entry into Shiv Sena

मुंबई : बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर(Urmila Matondkar) यांच्या शिवसेना(shivsena) प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भुजबळ यांनी उर्मिला यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं तीन पक्षांचं सरकार आहे. उर्मिला यांनी वर्षभरापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अनेक राजकीय पक्षांमध्ये बॉलिवूडमधील किंवा मराठी सिनेमातील कलाकार प्रवेश करतात. उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केला ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं मी सक्रीय राजकारणात स्वागत करतो. त्यांनी आधी काँग्रेससोबत काम केलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली पण तरीही जर त्या राजकारणात येऊन शिवसेनेच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्यास तयार असतील, तर त्यांचे स्वागत असल्याचे भुजबळ म्हणाले.