सात जूनपर्यंत समाजासाठी ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करा, अन्यथा  रायगडावरून आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल : खा संभाजीराजेंचे सरकारला आव्हान!

मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मराठा समाजातील नेत्यांची समिती स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या प्रश्नावर दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ९ ऑगस्ट च्या सुमारास दिल्लीत या विषयावर गोलमेज परिषद घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

  मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षाच्या नेत्यानी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असे छत्रपतींचा वंशज म्हणून आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी हात जोडून केले आहे. येत्या सात जून पर्यंत राज्य सरकारच्या हातात समाजासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही सरकारने समाजाकडे दुर्लक्ष केले तर आपण सर्व पक्षांच्या लोकप्रतिनीधीसह रायगडावरून आंदोलनाची घोषणा करू. ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा लढा देण्यासाठी सरकारने घाई न करता परिपूर्ण फेरविचार याचिका दाखल करावी.

  परिपूर्ण कायदेशीर निर्णय घ्या
  भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी या पत्रकार परिषदेत समाजाची स्थिती आणि अवस्था वाईट असल्याचे सांगितले. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी फेरविचार याचिका, त्यानंतर क्यूरेटिव पिटीशन किवा घटनेच्या कलम ३४२ अ नुसार राज्यपालांमार्फत प्रस्ताव देण्याबाबत राज्य सरकारने तज्ज्ञांच्या मदतीने निर्णय घ्यावा असे ते म्हणाले. त्यासाठी मागासवर्ग आयोगाची स्थापना नव्याने करून गायकवाड समितीच्या अहवालातील त्रुटी दुरूस्त कराव्या असे ते म्हणाले.

  ओबीसीमध्ये नवीन प्रवर्ग शक्य आहे का
  या शिवाय ओबीसी मध्ये नवीन प्रवर्ग तयार करणे शक्य आहे का? हे पहावे ते म्हणाले की हे मी सांगणार नाही त्यावर सर्वपक्षीय नेते  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे.  ते म्हणाले की ३० टक्के श्रीमंताना वगळून वंचितांना आरक्षण मिळावे या मताचा मी आहे.

  ७ जून पर्यंत काय करणार सांगावे
  सध्या आंदोलनाची भुमिका घेण्याबाबत योग्य वेळ नसल्याचे सांगत ते म्हणाले की, सध्या सरकारला जे शक्य आहे तेवढे तरी त्यांनी केले तरी आरक्षणाच्या पर्यायामुळे गरीबाना मदत होणार आहे. ते म्हणाले की सारथी आणि आण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम कैल पाहिजे, त्यात समाजाची आस्था असणा-यांना घेतले पाहीजे. वसतीगृहांच्या योजना इत्यादी कामे वेळेत झाली पाहीजेत. इतर मागास समाजाला ज्या सवलती मिळतात त्या सवलती शिक्षणात मराठा समाजाला दिल्या पाहिजेत. या गोष्टी बाबत येत्या ७ जून पर्यंत सरकार काय करणार आहे ते सांगावे त्यानंतर कोविड वगैरे काही असलेतरी मी स्वत: आंदोलनाची भुमिका जाहीर करणार आहे.

  नवा पक्ष काढण्याचा विचार करू
  या मध्ये समाजाला वेठीस धरणार नाही सर्व आमदार खासदार लोकप्रतिनीधी यांना येण्याचे आवाहन करनार आहे ते म्हणाले सरकारने या साठी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे किंवा आम्ही ऑगस्ट महिन्यात दिल्लीत सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांची गोलमेज परिषद घेवू असे जाहीर करावे. ते म्हणाले की ७० टक्के समाजाची इच्छा असेल तर बहुजनांचा नवा पक्ष काढण्याची घोषणा करण्याचा विचार करूअसे ते म्हणाले.