छोटा राजनची उच्च न्यायालयात धाव, विशेष सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान

२०१२ मधील हॉटेल बी.बी. शेट्टी यांची हत्येचा प्रयत्न, २०१२ मालाड इन्फिनिटी मॉलमधील गोळीबार आणि नवी मुंबईतील विकासकाशी संबंधित खंडणी वसूलीप्रकरणी राजनला दोषी ठरविण्यात आले असून त्याविरोधात राजने अपील दाखल केले आहे. सदर याचिकेवर न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

    मुंबई  – कुख्यात गुंड राजेंद्र निकालजे उर्फ छोटा राजनने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. विशेष सत्र न्यायालयाने तीन विविध प्रकरणात दोषी ठरविले आहे. त्या आदेशाला राजनने आव्हान दिले असून त्याची दखल घेत न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे.

    २०१२ मधील हॉटेल बी.बी. शेट्टी यांची हत्येचा प्रयत्न, २०१२ मालाड इन्फिनिटी मॉलमधील गोळीबार आणि नवी मुंबईतील विकासकाशी संबंधित खंडणी वसूलीप्रकरणी राजनला दोषी ठरविण्यात आले असून त्याविरोधात राजने अपील दाखल केले आहे. सदर याचिकेवर न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

    तेव्हा, सीबाआयकडे राजनविरोधात कोणताही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे राजनला दोषी ठरविण्यात आलेला विशेष न्यायालयाचा आदेश रद्दबातल करण्यात यावेत, अशी मागणी राजनच्यावतीने खंडपीठाकडे करण्यात आली. त्याची दखल घेत खंडपीठाने सीबीआयला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.