Postponement of Kanjur Metro car shed, Chief Minister should apologize to the people, BJP demands

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी थेट निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी थेट निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची अलिबाग येथे पाच कोटीची संपत्ती आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी तक्रारीत केला आहे.

अन्वया नाईक हत्या प्रकरण, तसेच अनेक ठिकाणच्या आर्थिक व्यहरांत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. ट्विट तसेच प्रसारमाध्यमांमध्ये कागजपत्र सादर करत सोमय्या हे आरोप करतात. आता त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडेच तक्रार केली आहे. आता निवडणुक आयोग या तक्रारींची कशा प्रकारे दखल घेते याकडे लक्ष लागले आहे.