Let's overcome corona and build health; Happy New Year to Chief Minister Uddhav Thackeray

    मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महापुजेसाठी रस्तामार्गे भरपावसात पंढरपूरला रवाना झाले. तर मानाच्या पालख्यांसोबत फक्त पन्नास वारकऱ्यांना परवानी देण्यात आली आहे. यावरुनच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

    भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अभंगातून ट्विट करत टिका केली आहे. ‘जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम. पावसात मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री असे ट्विट त्यांनी केले आहे.