uddhav thakre

आरेमधील मेट्रो ३ कारशेड तसेच वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लगेच सुरू करण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून तसे ट्विट  करण्यात आले आहे.

आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता गेल्या वर्षी आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनीदेखील याला अनुमोदन दिले.  त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही करावी असे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.