मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १.३० वाजता जनतेला संबोधित करणार

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. हा लॉकडाऊन ४ टप्प्यात करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्यात देशात काही अटी ह्या

 मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. हा लॉकडाऊन ४ टप्प्यात करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्यात देशात काही अटी ह्या शिथील करण्यात आल्या होत्या. या ५ व्या टप्प्याचा शेवटचे दिवस राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दि. २८ जून २०२० रोजी दुपारी  १:३० वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनच्या ६व्या टप्प्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात अटी शिथील केल्यानंतर वाढणारे कोरोना रुग्ण यावर देखील भाष्य करणार असल्याची शक्यता आहे. अटी शिथिल केल्यानंतर कोरोनचा उद्रेक झाला आहे. कोरोना उपाययोजनाबाबत नवीन नीयमावली जाहीर करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. निसर्ग चक्रिवादळातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या काही खास पावले उचलतात का याकडे देखील जनतेचे लक्ष लागले आहे.

पावसाळापुर्व कामे तसेच कोरोनाबरोबरच साथींच्या आजाराबाबत उद्धव ठाकरे काय भाष्य करणार यावर लोकांचे लक्ष्य आहे. खासगी रुग्णालयांची मक्तेदारीबाबत काही कठोर पावले उचलले आहेत की नाही याबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करणार आहेत, हे जनतेला जाणून घ्यायचे आहे.