राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    मुंबई : राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.

    लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार

    उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.

    जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न

    सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपलब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.

    उत्तम नियोजन करावे

    १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे.

    कोविन अँपवर नोंदणी करा

    या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल अँपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात.

    आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य
    मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
     
    पुरवठ्यानुसार लसीकरण नियोजन
    लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे. या वयोगटातील नागरिकांनी  कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    ६५०० कोटी रुपयांचा भार
    सरसकट मोफत लसीकरण करताना १८ ते ४४ या वयोगटात राज्यात ५ कोटी ७१ लाखांहून अधिन नागरिक आहेत. यासाठी १२ कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठी राज्य सरकार ६५०० कोटी रुपयांचा भार येणार आहे. शासनाच्या या निर्णय़ाचे सर्वांनीच स्वागत केले आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्याचे हे पाऊल मोठा दिलासा देणार आहे.
     
    दुसरी लाट ओसरायला सुरुवात
    दरम्यान, राज्यात कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकित टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तवले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे ३० एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभरात नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.

    हाफकिनला लसप्रकल्प सुरूकरण्यास मान्यता
    हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास कोविड लस प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्यासहाय्याने भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. हैद्राबाद या कंपनीकडून कोविड-१९ या साथ रोगाच्या लसीचे उत्पादन तंत्रज्ञान घेऊन महामंडळाच्या परळ, मुंबई येथील जागेत रूपये १५४ कोटी भांडवली खर्चाच्या कोवॅक्सिन लस उत्पादनाचा हा प्रकल्प सुरू होईल. प्रकल्पाच्या उभारणीसाठी रूपये ९४ कोटी इतके अर्थसहाय्य राज्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून खर्च करण्यात येईल. केंद्र शासनाने रूपये ६५कोटी इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे.