‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. आधी मी बोललो होतो 'तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो' पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज सोशल मीडियाद्वारे (Social media) राज्यातील जनतेशी संवाद साधला. तसेच कोरोना विषाणूच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर त्यांनी ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आता कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट आली की काय अशी भीती आहे. खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. आधी मी बोललो होतो ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो’ पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातील १२ कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय आहे. प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल तसेच  प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, ५०-५५ वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि व्याधीची माहिती घ्या. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ऑनलाईन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावू नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका. ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ८० टक्के ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.