cm

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत मुंबई पोलीस उत्तम प्रकारे चौकशी करत आहे. तसेच मुबई पोलीस तपासात कार्यक्षम आहे. या प्रकरणाबाबत कोणाकडे पुरावा असल्याल तो मुंबई पोलीसांकडे सुपूर्द करावा. आणि कोणत्याही प्रकारे याला राजकारणाचा रंग लावू नये किंवा राजकारण करु नये. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबई – सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस आणि बिहार पोलीसांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रासह बिहारमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांतसिंग राजपूतच्या चाहत्यांनी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सोशल मिडियावर तगादा लावला आहे. तसेच या प्रकरणात आता राजकारणीही आपले डोके वर काडत आहेत. त्यामुळे राजकारणाचा रंग लागत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आपले मौन सोडले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करण्यात सक्षम आहे. तसेच याला कोणताही राजकारणाचा रंग लावू नये. अशा शब्दांत विरोधकांना टोला लगावला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत मुंबई पोलीस उत्तम प्रकारे चौकशी करत आहे. तसेच मुबई पोलीस तपासात कार्यक्षम आहे. या प्रकरणाबाबत कोणाकडे पुरावा असल्याल तो मुंबई पोलीसांकडे सुपूर्द करावा. आणि कोणत्याही प्रकारे याला राजकारणाचा रंग लावू नये किंवा राजकारण करु नये. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

तसेच कोणताही पुरावा या प्रकरणासाठी महत्त्वाचा आहे. यातील दोषींना चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमध्ये या प्रकरणावरुन वादंग निर्माण करु नये असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी जोर धरत असल्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते. की सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवलि जाणार नाही. तसेच मुंबई पोलीस यासाठी सक्षम आहे. 

शुक्रवारी दि (३१जुलै)ला देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य करत म्हटले होते की, सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असे जनतेचे मत आहे. पण राज्य सरकारचा या विरोध पाहता ईडीने या प्रकरणात ईसाआयआर दाखल करावी आणि आर्थिक बाबिकडून चौकशी सुरु करावी.