मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या!

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यानी पंतप्रधान नरेद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत गुप्तगू केली होती. त्यानंतर आज वाढदिवसांचे औचित्य साधत त्यांनी गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादाला पूर्णविराम दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल व राज्य सरकारमध्ये कटूता असताना मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची ठरत आहे.

  मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाढदिवशी सकाळपासून अनेक नेते, दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुद्दाम राजभवनावर भेट घेऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे या भेटीना राजकीय वर्तुळात महत्वाचे मानले जात आहे.

  समक्ष भेटून शुभेच्छा

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक महिने दूरदृश्य प्रणालीतून काम करत आहेत. मात्र आजत्यांनी राजभवन येथे जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त त्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

  वादाला पूर्णविराम दिल्याची चर्चा

  काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यानी पंतप्रधान नरेद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत गुप्तगू केली होती. त्यानंतर आज वाढदिवसांचे औचित्य साधत त्यांनी गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेल्या राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादाला पूर्णविराम दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल व राज्य सरकारमध्ये कटूता असताना मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची ठरत आहे.

  राज्यपाल ‘त्या’ यादीवर निर्णय घेण्याची शक्यता
  गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारकडून ६ नोव्हेंबरला विधान परिषदेसाठीच्या १२ नावांचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. सात महिन्यांपासून राज्यपालांकडून या यादीवर निर्णय झाला नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्यपाल या यादीवर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  संजय राऊत यांचे हटके व्टिट

  दरम्यान, खा संजय राऊत यानी वेगळ्या शैलीत व्टिट करत राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच १२ आमदारांच्या यादीची आठवण करुन दिली आहे. त्यामुळेही दिल्लीहून राज्यपालांना काही संदेश मिळाल्याने राऊतांनी व्टिट केल्याची चर्चा रंगली आहे. खा राऊत यांनी व्टिट केले आहे की, ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी. बाकी लोभ आहेच. तो तसाच राहिल,’

  अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी

  दरम्यान, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही राजभवनावर भेट देत राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आहेत.