udhav thackrey

भारतीय संस्कृती आणि त्यातही हिंदू संस्कृती, सभ्यता जगभरात पोहचविण्यासाठी ते भारताचे विश्र्वदूत होते आणि यापुढेही राहतील. त्यांचे विचार आणि जीवन हे आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असेच आहेत.

मुंबई: स्वामी विवेकानंद यांनी हिंदू संस्कृती आणि सभ्यता जगभरात पोहचविण्यासाठी संपूर्ण जीवनच समर्पित केले. आचार, विचार, व्यवहार याबाबत त्यांनी सहज सोप्या भाषेत आणि तितक्याच स्पष्टपणे मांडणी केली. ही मांडणी आजच्या युवा पिढीसह येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करणारी ठरेल अशीच आहे. भारतीय संस्कृती आणि त्यातही हिंदू संस्कृती, सभ्यता जगभरात पोहचविण्यासाठी ते भारताचे विश्र्वदूत होते आणि यापुढेही राहतील. त्यांचे विचार आणि जीवन हे आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असेच आहेत, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना व्यक्त केले. यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.