राज्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर, पहा असा असेल दौरा

या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आज (गुरुवारी) सातारा, रत्नागिरी आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. आज सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पावरील कोयना टप्पा ४ विद्युतगृहाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर साताऱ्यातील पाटण येथे कोयना धरणाची ते पाहणी करणार आहेत.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी ५ डिसेंबर रोजी अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन समृद्धी महामार्गाच्या कामाची (review the development work) पाहणी केली व आढावा घेतला. या मार्गाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालले आहे. सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत आहोत. येत्या १ मे पर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मे पर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू,असा विश्वास या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आज (गुरुवारी) सातारा, रत्नागिरी आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. आज सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पावरील कोयना टप्पा ४ विद्युतगृहाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर साताऱ्यातील पाटण येथे कोयना धरणाची ते पाहणी करणार आहेत. ही पाहणी संपल्यानंतर हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री मावळला दाखल होतील. तिथून मोटारीने ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. २ च्या प्रकल्पस्थळाकडे जाणार आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची मुख्यमंत्री पाहणी करतील. प्रकल्पाच्या कॅम्प ऑफिसमध्ये याबाबत एक सादरीकरणही होणार आहे. ते पाहिल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईला परतणार आहेत.