Chief Minister Uddhav Thackeray LIVE

  मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)जनतेशी संवाद साधत आहेत. मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लॉकडाऊन वाढणार की अनलॉकला सुरु होणार याबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडेही लक्ष लागले आहे.

  मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  कोरोनाचा धोका असल्याने निर्बंध लादावे लागत आहेत.
  तिसरी लाट लहाान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते
  लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे
  १२ कोटी लशींची गरज १८ ते ४४ वयोगटासाठी
  लशींचे प्रमाण वाढले की वेग वाढेल
  १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण येत्या काळात वेगाने होईल.
  बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स
  ऑक्सिजन, डॉक्टराची कमतरता भासण्याची शक्यता
  काळ्या बुरशीचीही भीती वाढली
  अजूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही
  गेल्या वर्षी इतकेच सक्रिय रुग्ण पहायला मिळत आहेत.
  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के
  मृत्यू दर १.९२ टक्के कमी झाला आहे.
  रुग्ण बरे होत असले तरी काही जिल्ह्यांत अडचणी
  गेल्या वेळचा व्हायरस यावेळचा व्हायरस यात फरक आहे.
  हा व्हायरस वेगाने पसरतोय
  संसर्ग करण्याचा वेग जास्त आहे
  ऑक्सिजनची आवश्यकता वाढली,
  राज्यात ६००च्या आसपास प्रयोगशाळा
  आयसीयू, ऑक्सिजन बेड वाढवले आहेत
  गेल्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण होईल का, याची भीती वाटते.
  विषाणूला अजूनही काबूत आणू शकलेलो नाही
  बंधने पाळण्याबाबत सर्वांचे अभिनंदन

  शिक्षण

  १० वीच्या परीक्षा रद्द केल्या आहे मूल्यांकन करुन पास करणार
  १२ वीच्या बाबतीत आढावा घतोय, लवकरच निर्णय
  केंद्राने याबाबत धरण ठरवायला हवे
  पीएमना विनंती आहे की, सर्व देशासाठी एक धोरण असायला हवे.
  १२ वीच्या परीक्षांबाबत निर्णय व्हावा
  शिक्षणाच्या बाबतीत क्रांतिकारक निर्णय घेण्याची गरज
  वर्क फ्रॉम होम सारखं शिक्षण
  कोविडसोबत राहायचं नाही, मात करायची आहे.

  कोरोनामुक्तीची सुरुवात महाराष्ट्रापासून करा

  आता काही मोहिमा कराव्याच लागतील.
  ग्रामीण भागात लाट वाढतेय, शहरात नियंत्रणात आहे
  कोरोनामुक्त गाव, घर कोरोनामुक्त, वस्ती कोरोनामुक्त
  हिवरे बाजार, घाटणे, अ़ंतरोळी सोलापूर, या गावात हे झालंय
  तिन्ही गावांच्या सरपंचांचे उदाहरण, सर्व सरपंचांना
  कोरोनामुक्त गाव ही नवी मोहीम
  याहीवेळी शेतीशी संबंधित दुकाने बंद राहणार नाहीत.

  वादळग्रस्तांना मदत

  चक्रीवादळाचे दुष्टचक्र आदळायला सुरु झालंय
  कोरोनाच्या संकटात चक्रीवादळांची भर
  तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई
  केंद्राचे मदतीचे निकष बदलण्याची गरज
  निसर्गप्रमाणे तौक्ते वादळग्रस्तांना मदत
  ही संकटे वारंवार येत असतील, तर किनारपट्टींवर कायमस्वरुपी बंदोबस्त, उपाययोजना करण्याची गरज
  बंधारे, पक्के निवारे, भूकंपरोधक घरे.
  याबाबत केंद्र सरकार मदत करेल अशी अपेक्षा, खात्री
  कोरोनाकाळात २ ७४ हजार मेट्रिक धान्य वाटप केले
  ८५० कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा