मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोशल मीडियावर कौतुक ; जुनाट रूढींना छेद देत केले ‘हे’ कौतुकास्पद काम, सोशल मीडीयात फोटो वायरल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या फोटोमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पदाचा मान बाजूला ठेवून महिला आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्या हस्ते कोस्टल प्रोजेक्टच्या टनेल बोरिंग मशिनचा शुभारंभ करताना नारळ वाढवून घेतला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या फोटोमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पदाचा मान बाजूला ठेवून महिला आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्या हस्ते कोस्टल प्रोजेक्टच्या टनेल बोरिंग मशिनचा शुभारंभ करताना नारळ वाढवून घेतला. जुनाट रूढींना छेद देत केलेले हे काम सर्वाना भावले त्यांच्या याच कृतीचं सोशल मीडीयात कौतुक होत आहे.

 

सर्वसामान्यपणे हिंदू धर्माच्या प्रथा परंपरांनुसार महिलांनी नारळ वाढवणं हे शुभ मानलं जात नाही पण कोस्टल रोड प्रोजेक्टच्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या भारतातील पहिल्या सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशिनचा शुभारंभ सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरोगामी महाराष्ट्राचा वसा पुढे नेला. नारळ वाढवण्याच्या प्रसंगी व्यासपीठावर मुंबईचे पालकमंत्री, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह एल अ‍ॅन्ड टीचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र या सार्‍यांनी नारळ वाढवण्याचा आग्रह अश्विनी भिडे यांना केला. त्यांनी देखील विनम्रतेने या मागणीचा स्वीकार करत नारळ वाढवला.