मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्यात सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव पुढे येणे; त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव आल्यानंतर देशमुख यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परामवीर सिंग यांनी 100 कोटींच्या हफ्ते वसुलीचा केलेला आरोप हा महाराष्ट्राच्या गृहविभागालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रतिमेवर कलंक लावणारा होता. तेंव्हाच गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता, त्यांनी राजीनामा द्यायला फार उशीर केला आहे, असेही आठवले म्हणाले.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला मात्र फार उशिरा राजीनामा दिला आहे. केवळ देशमुख यांनी राजीनामा देऊन चालणार नाही तर राज्यातील घडामोडींची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा दिला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

    देशमुखांच्या राजीनाम्याला उशीर

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्यात सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव पुढे येणे; त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव आल्यानंतर देशमुख यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परामवीर सिंग यांनी 100 कोटींच्या हफ्ते वसुलीचा केलेला आरोप हा महाराष्ट्राच्या गृहविभागालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रतिमेवर कलंक लावणारा होता. तेंव्हाच गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता, त्यांनी राजीनामा द्यायला फार उशीर केला आहे, असेही आठवले म्हणाले.

    राज्यात राष्ट्रपती राजवट लावा

    उशिरा का होईना राजीनामा दिला हे स्वागतार्ह आहे मात्र विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते हेच यातून निष्पन्न होत आहे.महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकार कुचकामी ठरले आहे. राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था पाहता आम्ही याआधी मागणी केली होती की महाराष्ट्र राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे ही आमची मागणी योग्य आहे, असेही ते म्हणाले.